घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

खराडीतील ‘व्हर्टीलास’ प्रकल्पात ९० टक्के पैसे भरूनही घरांचा ताबा नाही

ज्या सदिनेका हप्ता भरत आहे त्याचा ताबा मिळेल याची शाश्वती नाही. स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहिले असता आता बेघरासारखे जगावे लागत आहे. भाड्याचा बोजा, कर्जाचे हप्ते आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अवस्था अधिकच बिकट झाली आहे.

महारेरा आणि पोलिस प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही ठोस कारवाई होत नाही, अशी व्यस्था मांडली खराडी येथील ‘व्हर्टीलास सहकारी गृहरचना संस्था मर्यादित संस्थेत’ सदनिका बुक केलेल्या सदनिकाधारकांनी.घराचा वेळत ताबा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या सदनिकाधारकांनी सोसायटी परिसरात आंदोलन करत आपली व्यथा मांडली.

पुढील दहा दिवसांत घराचा ताबा न मिळाल्यास आत्मदहन किंवा इमारतीवरून उडी मारून टोकाचा निर्णय घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकल्पात १३० हून अधिक नागरिकांनी सदनिका बुक केल्या आहेत. बहुतांश सर्व सदनिकाधारकांनी सुमारे ९० टक्के पैसे देखील भरलेले आहेत. मात्र अद्याप प्रकल्प पूर्ण झालेला नाही. आमदार बापू पठारे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सदनिकाधारकांशी संवाद साधला.

तसेच खराडी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत कारवाई करण्याची मागणी केली.याबाबत सोसायटीच्या सचिव डॉ. सुप्रिया पाटील म्हणाल्या, ”पै-पै जमवून, आयुष्यभराची कमाई आपले हक्काचे घर व्हावे, यासाठी इथे गुंतवले. मात्र, आम्ही बेघर झालो आहोत. कर्जाचे हप्ते चालू आहेत. घरभाडे चालू आहे. त्यामुळे अनेकजण आर्थिक, मानसिक तणावाखाली आहे. आमची फसवणूक झाली असून, प्रशासन आणि संबंधित यंत्रणा याकडे कानाडोळा करत आहेत.’

‘विकसक अरमान कोठारी आणि सिद्धांत कोठारी यांनी दिलेल्या ताब्याची तारीख उलटून दोन वर्षे झाली. या प्रकरणी अनेकवेळा महारेरा, तसेच पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, कोणतीही ठोस कारवाई होत नाही. हा केवळ निष्काळजीपणा नसून, मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि २०० कोटींपेक्षा अधिक मोठा आर्थिक घोटाळा असल्याचे वाटत आहे.”

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें