घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे जिल्ह्यात कोट्यवधींचा फटका

जिल्ह्यात सोमवारी झालेला मुसळधार पाऊस व गारपिटीने विविध पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. अधिक फटका बसलेल्या काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मंगळवारी (ता.३१) महसूल तसेच कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली, तर भोर तालुक्यात जिल्हा कृषी अधीक्षकांनी पंचनामे करण्याचे निर्देश दिले.नारायणगावात शेतकरी उद्ध्वस्तनारायणगाव – नारायणगाव परिसरात सोमवारी (ता. ३०) सायंकाळी गारपिटीसह झालेल्या पावसाचा फटका तालुक्याच्या पश्चिम बागायती भागातील १५ ते २० गावांना बसला आहे. गारपिटीच्या तडाख्यामुळे कांदा, आंबा, गहू, टोमॅटो, द्राक्ष, केळी, फूल शेती या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.

निसर्गाच्या कोपामुळे बळीराजा अडचणीत असताना शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी किमान कृषी व महसूल विभागाचे अधिकारी यांनी सोमवारी (ता. ३१) नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी करणे आवश्यक होते. मात्र, कोणताही अधिकारी फिरकला नाही. नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत.

अन्यथा शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने जुन्नर तहसील व तालुका कृषी कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवनेरी शेतकरी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी दिला आहे.टोमॅटो, कांदा व भाजीपाला पिकांना बाजारभाव नाही.

शेतकरी अडचणीत असताना अचानक झालेल्या गारपिटीमुळे हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.नुकसानीचे पंचनामे करावेत याबाबत अद्याप आदेश प्राप्त झाले नाहीत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व कृषी अधिकारी यांना दिली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या भागातील मंडलाधिकारी, कृषी अधिकारी यांना पिकांच्या नुकसानीची माहिती द्यावी, असे तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी सांगितले.रब्बी पिके जमीनदोस्तचास – वाडा, गुंडाळवाडी आणि बुरसेवाडी (ता. खेड) परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार गारपिटीमुळे रब्बी पिके जमीनदोस्त झाली. फळबागांचे प्रचंड नुकसान झाले.

अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.वाडा परिसरात सोमवारी (ता. ३०) दुपारनंतर सुमारे एक तास चाललेल्या तुफान पाऊस आणि गारपिटीमुळे भाजीपाला, आंबा, पेरू, चिकू या फळबागांसह गहू व हरभरा ही पिके जमीनदोस्त झाली. गारांच्या मारामुळे झाडांची पाने गळून पडली पडली. जनावरांसाठी साठवलेला चाराही भिजला आहे.यामुळे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडल्याची भावना साईनाथ चंद्रावळे, कैलास आसवले, जालिंदर पोखरकर या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

प्रशासनाने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांनी केली आहे.नागरिकांची धांदलमहुडे – भोर शहरासह महुडे खोऱ्यात सोमवारी (ता. ३०) पडलेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली. शेतकऱ्यांनी वाळत टाकलेले धान्य घरात नेहताना, जनावरांना रचून ठेवलेला चारा तसेच वीटभट्टीवरील कच्च्या विटा झाकण्यासाठी वीट व्यावसायिक व शेतकऱ्यांची तारांबळ झाली.

भोर शहरासह शेजारील गावांमध्ये वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला. महुडे रस्त्यावरील भोलावडे हद्दीत झाडाच्या छोट्या फांद्या तुटून पडल्या तर किवत, शिंद येथे जनावरांसाठी रचून ठेवलेल्या गवताच्या गंजीवर प्लॅस्टिक कागद टाकण्यासाठी व वाळत टाकलेले धान्य घरात घेण्यासाठी तारांबळ झाली.अगदी थोडा वेळ उघडीप दिल्याने अडोशाला थांबलेल्या दुचाकीस्वारांनी प्रवासाला सुरवात करताच त्यांना भिजावे लागले. भोर शहरात नागरिकांना दुकानांचा आधार घ्यावा लागला. काही ठिकाणी वीजपुरवठा ही खंडीत झाला होता.

पंचनाम्यांचे निर्देश

उत्रौली – वडगाव डाळ (ता. भोर) येथे गारांच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी मंगळवारी (ता. ३१) प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले.

भोर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे कांदा, गहू, ज्वारी आणि फळबागांचे (आंबा, कलिंगड, चिक्कू) प्रचंड नुकसान झाले आहे.उत्रौली येथील शेतकरी योगेश तळेकर यांनी एक एकर कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याची व्यथा मांडली.

तहसीलदार राजेंद्र नजन यांनी सांगितले की, लवकरच नुकसानग्रस्तांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.दरम्यान, वडगाव डाळ (ता.भोर) येथे झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

या नुकसानीची जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी पाहणी केली तसेच बाधित कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.असे झाले नुकसानपीक संरक्षक आच्छादन व मल्चिंगचे कागद फाटले.आंबे, टोमॅटोच्या फळांना जखमाशेतातील कांदा भिजल्याने मोठे नुकसानउन्हाळी बाजरीचे पीक भुईसपाटया गावांना झोडपलेयेणेरे, वडज, सावरगाव, निमदरी, कसूर, तेजेवाडी, ओझर, शिरोली, जुन्नर परिसर

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें