घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सुधारणा न झाल्यास गुंडाविरुद्ध कडक कारवाई; आयुक्त अमितेश कुमार

हडपसरमधील रामटेकडी परिसरात दाट वस्ती आहे. या भागात गुन्हेगारी आहे. गुन्हेगारांना पोलिसांकडून सुधारण्याची संधी देण्यात येते. सुधारणा न झाल्यास गुंडाविरुद्ध कडक कारवाई करून त्यांची धिंड काढण्यात येईल,’ असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

हडपसरमधील रामटेकडी परिसरात नवीन पोलीस चौकी बांधण्यास बांधकाम व्यावसायिक नाईकनवरे यांच्याकडून सहाय्य करण्यात आले आहे. पोलीस चौकीचे भूमिपूजन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

आमदार चेतन तुपे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गु्न्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी आधिकारी सतीशकुमार खडके, नगरसेविका हेमलता मगर, बांधकाम व्यावसायिक हेमंत नाईकनवरे, रणजीत नाईकनवरे, गौरी नाईकनवरे या वेळी उपस्थित होते.

‘गृह विभागाने गेल्या वर्षी पुण्यात १२ नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली. नवीन पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरू झाले. पुणे पोलीस दलात लवकरच १८०० पोलीस शिपायांची भरती होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८०० पोलीस शिपाई सेवेत रूजू होणार आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याचे कामकाज चालविताना मनुष्यबळाची उणीव भासणार नाही.

रामटेकडी वसाहतीत ३० हजार नागरिक राहायला आहेत. या भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात येणार अहे. सराइतांना पोलिसांकडून सुधारण्याची संधी देण्यात येते. त्यांच्यात सुधारणा न झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, तसेच त्यांची धिंडही काढण्यात येईल,’ असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

‘पोलिसांकडून नगरसेवकांशी संवाद साधण्यात येत आहे. प्रभागातील गुन्हेगारी, अमली पदार्थ विक्री, अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी नगरसेवकांचे सहकार्य महत्त्वाचे असणार आहे,’ असे त्यांनी नमूद केले. चेतन तुपे, हेमंत नाईकनवरे यांनी मनोगत व्यक्त केले. रणजीत नाईकनवरे यांनी आभार मानले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें