घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

खानापूर परिसर नांदेड सिटी विभागात समाविष्ट करण्याची मागणी

खानापूर परिसरातील नागरिकांना वीज वितरण कार्यालयाच्या गैरसोयीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या हा भाग मुळशी विभागाशी जोडलेला असून संबंधित कार्यालय भरे (घोटावडे जवळ) येथे आहे.खानापूरपासून हे कार्यालय लांब अंतरावर असल्याने नागरिकांना तेथे जाणे कठीण होत आहे.

याशिवाय, त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही सोयीस्कर वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, खानापूर परिसरात लोकवस्ती व व्यवसाय झपाट्याने वाढत असून रिंग रोडमुळे भविष्यात या भागाचा अधिक विकास अपेक्षित आहे.या पार्श्वभूमीवर भविष्यात स्वतंत्र वीज वितरण कार्यालय सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे.

तोपर्यंत खानापूर परिसराचा समावेश नांदेड सिटी विभागीय कार्यालयात करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या संदर्भात संबंधित अधिकारी समवेत खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर निवेदन देण्यात आले असून लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा शिवसेनेचे तालुकाध्यक्षश्री. नितीन वाघ, श्री. माऊली भगत श्री. रामदास गायकवाड, श्री. पप्पू गायकवाड श्री. तुषार गायकवाडश्री. अजित पायगुडे व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें