घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अभ्यास अन् खर्चासाठी पत्नीला ३० हजार पोटगी; कौटुंबिक न्यायालयाचा निकाल

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीला अभ्यास आणि दैनंदिन खर्चासाठी पतीने दरमहा ३० हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश पुणे येथील कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. खान यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणात पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद व कौटुंबिक वादामुळे विभक्त राहण्याची वेळ आली होती. त्यानंतर पत्नीने पोटगीसाठी अर्ज केला होता. न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केले होते की, ती सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून, तिच्याकडे कोणतेही स्वतंत्र उत्पन्न नाही.

राहणीमान, अभ्यास साहित्य, फी आणि इतर दैनंदिन खर्च भागविणे कठीण जात असल्याने पतीकडून आर्थिक साहाय्य देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी तिने केली होती. तसेच, पतीकडून आवश्यक खर्चासाठी पुरेशी मदत मिळत नसल्याचेही तिने अर्जात नमूद कले होते.

पत्नीने ॲड. सोनल आरू, ॲड. प्राची जमदाडे-कोल्हे, ॲड. अजय मोहेळ आणि ॲड. दीपाली अडसूळ यांच्यामार्फत हा अर्ज केला होता.दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि कागदपत्रे तपासल्यानंतर न्यायालयाने पतीचे उत्पन्न, पत्नीची शैक्षणिक गरज आणि तिची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत, दरमहा ३० हजार रुपये पोटगी मंजूर केली.

ही रक्कम पत्नीच्या शिक्षणासह तिच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें