घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भीषण अपघात , वाळूच्या डंपरने दोन विद्यार्थिनींना चिरडले

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दसेगाव फाट्याजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात डंपरने दोन विद्यार्थिनींना चिरडलंय. अपघाताची बातमी समजताच दसेगाव आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने महामार्गावर जमा झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कुटीवर जात असलेल्या दोन विद्यार्थिनींना वाळूने भरलेल्या एका भरधाव डंपरने चिरडले. डंपरचा वेग प्रचंड असल्याने विद्यार्थिनींना सावरण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे.

अपघातानंतर गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थिनीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपघाताची बातमी समजताच दसेगाव आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने महामार्गावर जमा झाले. त्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्तारोको’ आंदोलन सुरू केले.संतप्त ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अपघातानंतर वाळूने भरलेले वाहन घटनास्थळावरून तातडीने का हलवण्यात आले? असा सवाल नागरिकांनी विचारला.धक्कादायक म्हणजे पोलिसांनी या अपघाताचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप आंदोलक ग्रामस्थांनी केला आहे.

आंदोलनस्थळी परिस्थिती तणावपूर्ण होताच उपस्थित पोलिसांनी तेथून पळ काढल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर ग्रामस्थ आक्रमक झाल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.संबंधित डंपर चालक आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें