घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वाहतूक नियमांचे पालन हाच अपघातमुक्त रस्त्यांचा मंत्र – विनय मोरे

वाई प्रतिनिधी | प्रशांत थोरवे

आपल्या देशात दर मिनिटाला पाच तर दरवर्षी सुमारे एक लाख ८० हजार व्यक्ती रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. वाहनांचा वेग आपल्याला मृत्यूकडे घेऊन जात असून रस्ते अपघातांमुळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी रस्ते वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सारथी सुरक्षा सेवा संस्थेचे सचिव विनय मोरे यांनी केले. एनसीसी, एनएसएस व विद्यार्थी कल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने किसनवीर महाविद्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा मोहीम या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. यावेळी सातारा आरटीओ अधिकारी सचिन बिसले, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रुपाली मोरे, रेखा चिरगुटे, सचिव पिंकी जैन, महाविद्यालयाचे उपप्राचार्य विनोद वीर, सामाजिक कार्यकर्ते नाना मोरे तसेच पत्रकार उपस्थित होते. विनय मोरे पुढे म्हणाले की, रस्ते अपघात टाळण्यासाठी सीटबेल्टचा वापर करणे, रस्त्यावर दिलेल्या सूचनांचे पालन करणे, वेगमर्यादेत वाहन चालवणे आवश्यक आहे. रात्रीचा प्रवास टाळावा, फॉग लाईट्सचा वापर गरज असल्यासच करावा. सिग्नलचे प्रकार व त्यांचा योग्य वापर, हेल्मेटचे महत्त्व तसेच रस्ता दुरुस्तीच्या वेळी बॅरिकेट्स लावणे किती गरजेचे आहे, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

सरकारकडून अपघातग्रस्त व्यक्तीस एक लाख पन्नास हजार रुपयांचे विमा कवच दिले जाते, तर अपघातग्रस्तास मदत करणाऱ्या व्यक्तीस २५ हजार रुपयांची मदत दिली जाते. आरटीओ अधिकारी सचिन बिसले म्हणाले की, दुचाकी चालवताना आयएसओ मानांकित दर्जाचे हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. तसेच अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार विठ्ठल माने म्हणाले की, रस्ते वाहतूक हा विषय केवळ नियमांचा नसून तो जीवन सुरक्षेचा आहे. रस्ते अपघातांत तरुणांचे मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत, ही चिंताजनक बाब आहे. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, आजचे व्याख्यान विद्यार्थ्यांचे जीवन सुरक्षित घडविण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना रस्ते वाहतूक सुरक्षिततेचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत मेजर डॉ. समीर पवार यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. राजेंद्र जयकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. एनसीसी विद्यार्थिनी वृषाली शिंदे हिने सूत्रसंचालन केले, तर डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमोल कवडे, प्रा. सुरज यादव व दत्ता काळे आणि एन सी सी कॅडेटस यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें