घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना!

मंचर (ता. आंबेगाव) शहरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना आज, शुक्रवारी (ता.३) सकाळी सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तपनेश्वर स्मशानभूमीजवळ घडली.

कौटुंबिक वादातून विवाहित महिलेने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून ती मृत झाल्याचा समज करून घेतल्यानंतर सहा वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. या दुर्दैवी घटनेत सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून आई व मुलगी जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत.

नेहाल आशिष बाणखेले (वय ६) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. परिज्ञा आशिष बाणखेले (वय १४) ही मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर व हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) या विवाहितेवरही मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. विहिरीतून मोठा आवाज आल्याने मंचर नगरपंचायतीचे नगरसेवक वसंतराव बाणखेले, सचिनराव बाणखेले नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यावेळी महिला व मुलगा पाण्यावर तरंगताना दिसले.

संजय वामनराव बाणखेले व गणेश बाणखेले यांनी विहिरीत उतरून दोघांना बाहेर काढले.त्यांना तत्काळ मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेकानंद फसाले यांनी तपासणी केल्यानंतर नेहाल याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान, पती आशिष बाणखेले यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पत्नी हर्षदा यांच्याकडे मुलगी परिज्ञा कुठे आहे, अशी विचारणा केली.

सुरुवातीला हर्षदाने टाळाटाळ केली. मात्र, नंतर तिने लालबाग प्राईड येथील सदनिकेत असल्याचे सांगून किल्ली दिली. सदनिकेचा दरवाजा उघडताच परिज्ञा अत्यावस्थ अवस्थेत आढळून आली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासात तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व पोलिस नाईक गणेश डावखर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हर्षदा या स्वतंत्र राहत होत्या. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात आशिष लक्ष्मण बाणखेले यांनी या घटनेविषयी फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पोलिस पथक या प्रकरणी पुढील तपास करीत आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें