घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

केज बसस्थानकावर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण चोरणाऱ्या महिलेला अटक

लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या मंजुश्री जगदाळे या महिला केज बसस्थानकावर थांबल्या असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण लंपास केले होते.ही घटना १९ मार्चरोजी दुपारी घडली होती.

या प्रकरणी मंजुश्री जगदाळे यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित महिला त्यांच्या मागे उभी असल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे ती बसमध्ये न चढता तेथून निघून गेल्याचेही आढळले.या धागेदोऱ्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने तपास सुरू केला.

जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बीड येथील माऊली नगर परिसरातून संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरीस गेलेले मिनी गंठणही जप्त करण्यात आले असून तिला पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेली महिला सराईत चोर असल्याचे समोर आले असून तिच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत. तिच्या अटकेमुळे आणखी काही चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें