घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

साताऱ्यात ज्येष्ठ महिलेची फसवणूक करणारा चोरटा अटकेत

सातारा शहरात ज्येष्ठ महिलेची फसवणूक करुन पसार झालेल्या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरात ही कारवाई करण्यात आली.

इब्राहीम बाबू इराणी (रा.इराणी वस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सातारा शहरातील शाहूपुरी परिसरातील एका बँकेतून रोकड काढून बाहेर आलेल्या ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करुन तिच्याकडील सात हजार रुपयांची रोकड इराणीने चोरुन नेली होती. या प्रकरणी साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही चित्रीकरणात चोरटा आढळून आला होता. त्यानुसार सातारा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. दरम्यान, ज्येष्ठ महिलेची फसवणूक करणरा चोरटा पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी महेंद्र कडू यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने इराणीला पाटील इस्टेट भागातील इराणी वस्तीतील राहत्या घरातून ताब्यात घेतले.

चौकशीत इराणीने सातारा शहरात ज्येष्ठ महिलेकडील रोकड चोरल्याचे उघड झाले.इराणी हा सराईत चोरटा आहे. त्याने पुणे शहर, जिल्हा, तसेच रायगड जिल्ह्यात ज्येष्ठांकडे बतावणी करुन त्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हेही दाखल झाले हाेते.

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे, सहायक निरीक्षक संताेष पाटील, उपनिरीक्षक प्रमोद पाटील, हवालदार संतोष मेमाणे, सचिन जाधव, महेंद्र कडू, रोहित झांबरे यांनी ही कारवाई केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें