घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

खासगी शाळांना पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा इशारा!

खासगी इंग्रजी माध्यम शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करू नये. अन्यथा संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिला आहे.

जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके शाळेतूनच घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. बाजारात हेच साहित्य कमी पैशांत उपलब्ध असताना शाळांकडून अधिक पैसे आकारले जात असल्याने पालकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.

तसेच, शासनाने दर दोन वर्षांनी १५ टक्क्यांपर्यंत शुल्क वाढ करण्याची तरतूद असतानाही काही शाळा त्यापेक्षा अधिक शुल्कवाढ करत असल्याचेही आढळले आहे. ही बाब गंभीर मानून शिक्षण विभागाने शाळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास पालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यास उर्वरित कालावधीचे शुल्क परत करणे बंधनकारक आहे. तसेच, शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानाने वागणूक देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ अंतर्गत चौकशी करून संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली जाईल, असा इशारा दिला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें