सकल हिंदू समाज पुरंदर तालुक्याच्या वतीने बुधवारी (ता. ८) सासवड ते येवलेवाडीदरम्यान ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने सकाळी सात वाजल्यापासून खडी मशीन चौक ते सासवड रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांनी सासवडकडे जाण्यासाठी खडी मशीन चौक – उंड्री चौक – मंतरवाडी फाटा – दिवेघाट- सासवड या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.












