घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*वरवंडमध्ये मध्यरात्री घरफोडीचा धक्कादायक प्रकार

वरवंड (ता. दौंड) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. येथील शेरीचा मळा परिसरात शुक्रवारी (ता. ३०) मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसखोरी करत घरातील पती-पत्नीला बेदम मारहाण करून सोन्याचे दागिने, रोकड व मोबाइल असा मुद्देमाल लुटून पोबारा केला.

या घटनेप्रकरणी पाटस पोलिस चौकीत दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जनार्दन नाना दिवेकर (रा. वरवंड, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र फणसे यांनी माहिती दिली.

फिर्यादी जनार्दन दिवेकर यांचे वरवंड-कानगाव रस्त्यालगत शेरीचा मळा परिसरात घर आहे. गुरुवारी मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी शिताफीने घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील कपाट उघडून साहित्य अस्ताव्यस्त फेकले आणि कपाटातील १३ हजार रुपये रोकड चोरून नेली.

यावेळी बाजूच्या खोलीत झोपलेल्या पत्नी सोनाली दिवेकर यांच्या चेहऱ्यावर चोरट्यांनी बॅटरीचा उजेड टाकत त्यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना हिसकावला. अचानक जाग आल्याने सोनाली दिवेकर यांनी आरडाओरडा केला. मात्र, चोरट्यांनी हातातील लोखंडी गजाने त्यांना बेदम मारहाण केली.

आवाज ऐकून दुसऱ्या खोलीत झोपलेले जनार्दन दिवेकर जागे झाले असता चोरट्यांनी त्यांनाही लोखंडी गजाने मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी तीन तोळे सोन्याचे दागिने, १३ हजार रुपये रोकड आणि दोन मोबाइल फोन असा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

दिवेकर दाम्पत्याने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील किशोर दिवेकर यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत गावातील नागरिकांना मोबाइलद्वारे सतर्कतेचा संदेश दिला.

माहिती मिळताच पाटस पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने, पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर, सहाय्यक फौजदार महेंद्र फणसे यांच्यासह पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली असता घरालगत असलेल्या उसाच्या शेतात चोरट्यांच्या पाऊलखुणा आढळून आल्या.

दिवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर यांनी दिली आहे.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें