घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आधी नोकरी द्यायचे, मग रिसॉर्टवर नेऊन करायचे अत्याचार

मागील काही दिवसांपासून नाशिक शहर महिलांवरील लैंगिक अत्याचाराचं हब बनत चाललं आहे. काही दिवसांपूर्वी इथं अशोक खरात प्रकरण उघडकीस आलं होतं. खरात याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या प्रकरणानंतर रवींद्र एरंडे याचं प्रकरण उघडकीस आलं. त्याने देखील काही ओळखीच्या महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. त्याच्या टॅबमध्ये काही महिलांचे विवस्त्र अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओज आढळून आले आहेत. या दोन घटना ताज्या असताना आता नाशिकमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराचं तिसरं प्रकरण उघडकीस आलं आहे.

नाशिकच्या एका नामांकित आयटी कंपनीत काही महिलांवर तिथल्या वरिष्ठांनी लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी काही महिला कर्मचाऱ्यांच्या धर्माबद्दल टिप्पणी करत, तसेच त्यांच्या अवयवांकडे पाहून अश्लील हावभाव करत विनयभंग देखील केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तब्बल ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या देखील ठोकल्या आहेत. सर्व आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण झालं आहे. तसेच एका तरुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. २५ मार्च रोजी पहिल्यांदा तक्रार झालेल्या या प्रकरणाबाबत शहर पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळली होती. याप्रकरणी २५ मार्च रोजी देवळाली कॅम्प येथे पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर २ एप्रिल रोजी ७ आणि ३ एप्रिल रोजी १ असे एकूण ८ गुन्हे मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाले.

त्यात २ गुन्ह्यांतील ५ संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसिफ अत्तार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.एका पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी पीडित तरुणीला एका रिसोर्टवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.

आरोपींनी आधी तिची मुलाखत घेतली होती. यानंतर त्यांनी तिची नोकरीसाठी शिफारस केली. नोकरी मिळाल्यानंतर ‘तुला माझ्यामुळेच नोकरी मिळाली, असं वारंवार सांगून उपकाराची भावना निर्माण केली. काही दिवसांनी तिच्यावर सुट्टी घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. सुटीच्या दिवशी मुलींना विविध रिसॉर्टमध्ये घेऊन गेले. तेथे जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केला, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें