घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

प्रेमात अडथळा, आईनेच प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या मुलाला संपवलं

आई आणि तिच्या प्रियकराने संगनमत करून सहा वर्षांच्या निष्पाप बालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाचा खून केल्यानंतर त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचे महिलेने नातेवाईकांना भासवले.

ही घटना ४ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास कुरुळी, ता. खेड येथील एका भाड्याच्या खोलीत घडली आहे.अवेज मेहबूब शेख (वय ६ वर्ष) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

या प्रकरणात इसाक महमद शेख (४९, पुस, ता. आंबेजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बसरीन मेहबुब शेख (२७, कुरुळी, ता. खेड, जि. पुणे, मूळ – धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड) हिला अटक केली असून, तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड (कुरुळी, ता. खेड, मूळ – पुस, ता. आंबेजोगाई, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसरीन शेख आणि राम कजेवाड यांचे प्रेम संबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधात सहा वर्षीय आवेज हा अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघा आरोपींनी 4 एप्रिल रोजी रात्री त्याला बाथरूम मध्ये नेले. त्याचे डोके बादलीतील पाण्यात बुडवून आणि भिंतीवर आपटून त्याला ठार मारले.

त्यानंतर मृतदेह धर्मापुरी परळी बीड येथे नेऊन त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव केला. मात्र, यामध्ये नातेवाईकांना संशय आला.नातेवाईकांनी बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली.

आवेज याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला नसून पाण्यात बुडाल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अवेज याच्या आईला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. परळी ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें