घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

गॅस टंचाईवर पुणेरी जुगाड; पाटी वाचून पोट धरुन हसाल

सध्या अमेरिका आणि इराण युद्धामुळे जगभरातील अनेक देशांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे.भारतातही गॅस आणि पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे हॉटोल आणि फूड इंड्रस्टीला मोठा फटका बसला आहे. अनेक स्ट्रीट फूड व्यवसाय बंद झाले आहे. हॉटेल्स बंद झाले आहे. तर काही ठिकाणी खाण्याच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याच दरम्यान एका पुणेरी पाटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. एका पुणेकराने गॅस टंचाईवर पुणेरी टोला लगावला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक पुणेरी पाटी व्हायरल होत आहे. युद्धामुळे भारतात गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक छोटे चहाचे स्टॉल बंद झाले आहे. यावर एका चहाच्या स्टॉलवाल्याने लोकांना एक दिलदार ऑफर दिली आहे. एका मीनाक्षी नावाच्या टी-स्टॉल वाल्याने एक खास पाटी लावली आहे. या पाटीवर लिहिले आहे, प्रिय ग्राहक, गॅसची टाकी द्या आणि युद्धसंपेपर्यंत फुकटात चहा प्या. यावर एकही टीपही देण्यात आली आहे. गॅस टाकी फुकट घेणार नाही, त्याचे पैसेही दिले जातील. यावरुन गॅसची टंचाईचा प्रश्न स्पष्टपणे दिसत आहे. सध्या ही पाटी सोशल मीडिय प्रचंड व्हायरल होत आहे.

या पाटीवर नेटकऱ्यांनी अनेक भन्नाट भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. हा नक्कीच पुणेकर आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका पुणे तिथे काय उणे म्हटले आहे. काहींनी गॅसची टाकी घेऊन येते, पण दिवसाला किती चहा मिळणार असा प्रश्न केला आहे. तर एकाने, युद्ध संपला भाऊ काल पासून….तु गॅस टाकी संपवली असती….म्हणजे….2-3 चहा मला 900/- पडला असता असे गणितच मांडले आहे. तर एकाने गॅसचे पैसे तुम्ही देणार, आम्ही तुम्हाला आणून देणार म्हणजे गॅसच्या रांगेत तुम्हाला उभे राहायचे नाहीय तर असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजीही शेअर केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें