घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

चप्पल घालून 5 किमी धावला उमेदवार, कारण ऐकून DCP च्या डोळ्यात पाणी

“परिस्थिती माणसाला हरवू शकते, पण जिद्दीला नाही…” याचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान आला. भरतीचं मैदान गाजवण्यासाठी आलेले शेकडो तरुण डोळ्यांत स्वप्न घेऊन धावत होते.पण यात एक असा तरुण होता ज्याच्याकडे धावण्यासाठी साधे शूजही नव्हते. अनवाणी पायाने किंवा साध्या चप्पलवर पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर त्याने आपल्या कर्तृत्वाने दिलं.

शूज घ्यायला पैसे नव्हते, पण जिद्द होती!

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पोलीस होण्यासाठी त्याने जीवाचं रान केलं, पण सरावासाठी साधे शूज घेणंही त्याला परवडणारं नव्हतं. ज्या मैदानात इतर उमेदवार चांगले शूज घालून धावत होती, तिथे हा तरुण केवळ पायात चप्पल घालून ५ किलोमीटरच्या रनिंगसाठी उतरला. चप्पलवर धावणं कठीण होतं, पाय सोलवटले जात होते, पण डोळ्यांसमोर आई-वडिलांची गरिबी आणि खाकी वर्दीचं स्वप्न होतं. त्याने ते अंतर यशस्वीपणे पूर्ण केलं.

DCP साहेबांची नजर पडली अन्…

भरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी DCP विक्रम साळी तिथे मैदानावर आले. त्यांनी उमेदवारांशी संवाद साधला. त्यांची नजर चप्पल घालून धावणाऱ्या त्या उमेदवारावर पडली. साहेबांनी जवळ बोलावून विचारलं, “तू चप्पलवर का धावलास?” तेव्हा त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. “साहेब, शूज घ्यायला पैसे नव्हते, घरची परिस्थितीही नाहीय. पण पोलीस होण्याचं स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार,” असं तो म्हणाला.

खाकीतल्या माणुसकीचं दर्शन

त्या तरुणाची परिस्थिती ऐकून DCP विक्रम साळी भावुक झाले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या खिशातून पैसे काढले आणि सहकाऱ्यांना त्या मुलासाठी नवीन शूज आणायला पाठवले. काही वेळातच समोर पांढरे शुभ्र शूज आले. जेव्हा DCP साहेबांनी स्वतःच्या हाताने ते शूज त्या मुलाला दिले, तेव्हा तिथे कुणीतरी व्हिडीओ काढू लागलं. पण विक्रम साळी यांनी सांगितलं, “व्हिडीओ नका काढू, आपली ही मदत खूप छोटी आहे.

“नवे शूज, नवी ऊर्जा!

नवीन शूज हातात घेतल्यावर त्या मुलाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्याने वाकून DCP विक्रम साळी यांचे आशीर्वाद घेतले. त्याच्या पाठीवर हात ठेवून कमी वेळात रनिंग पूर्ण कर म्हणत DCP नी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. उमेदवाराच्या चेहऱ्यावरचा तो आनंद साऱ्या जगासाठी एक प्रेरणा होती. “आता मी घरी सांगेन की, सरांनी मला हे शूज गिफ्ट दिलेत,” असं म्हणताना त्याचा आत्मविश्वास वाढला आणि मैदानात परीक्षेत जिंकण्याची जिद्दही वाढली.हा व्हिडीओ खूप इमोशनल करणारा आहे.

कितीही संकट आली वाईट परिस्थिती आली तर पराभूत व्हायचं नाही, हे याव्हिडीओमधून दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येईल. SRPF Gr. छत्रपती संभाजीनगर या इन्स्टा पेजने व्हिडीओ शेअर केला आहे. विक्रम साळी हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष DCP (पोलीस उपायुक्त) आणि SRPF गट क्र. १४ चे कमांडंट म्हणून कार्यरत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें