घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सागरी किनारी रस्ता, महामार्गांच्या सफाईवर भर द्या!

मुंबईची स्वच्छता प्रभावीपणे करण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात यावी आणि ती योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी सहायक आयुक्तांनी नियमितपणे आपल्या विभागात महत्त्वाच्या ठिकाणी भेटी द्याव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गुरुवारी दिले.

आयुक्त भिडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपक्रम आणि कामकाजाचा आढावा महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत घेतला. महापालिका आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त प्रशांत गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर, संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

शहराची स्वच्छता नियमित आणि प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. मुंबईतील सागरी किनारी रस्ता व महामार्गांवर चांगली स्वच्छता झाली पाहिजे, असे भिडे यांनी सांगितले.९८८ वाहनांद्वारे कचरा संकलन, वाहतूकयावेळी दिघावकर यांनी सविस्तर सादरीकरण केले. सध्या मुंबईतून सुमारे ७,२०० मेट्रिक टन घनकचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.

संपूर्ण मुंबईत उत्तम प्रकारे स्वच्छता राखण्यासाठी सेवा आधारित कंत्राट पद्धती अवलंबिण्यात आली आहे.घनकचरा संकलन व वाहून नेण्यासाठी नवीन वाहने आणली आहेत. पूर्वी यासाठी एक हजार १९६ वाहने कार्यरत होती. आता या वाहनांची सख्या ९८८ वर आली आहे.मुंबईत ४६ ठिकाणी सुका कचरा विलगीकरण केंद्रे आहेत; तर, ९४ वाहने यासाठी पूर्णवेळ कार्यरत आहेत.

सॅनिटरी कचरा संकलनासाठी पालिकेकडून विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.’मुंबई क्लीन लीग’मध्ये सर्वांनी सहभागी व्हा!शहर परिसरातील स्वच्छता मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी ‘मुंबई क्लीन लीग’ या स्पर्धेत नागरिक तसेच आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही अश्विनी भिडे यांनी केले.

तसेच महापालिका प्रशासनालाही सूचना केल्या आहेत.४६ जागी सुका कचरा विलगीकरण केंद्रे आहेत; तर, ९४ वाहने यासाठी पूर्णवेळ कार्यरत आहेत. पावसाळ्यात पाणी निचरा सुरळीत व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत असल्याचेही पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें