घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

छ.संभाजीनगरमधील पूजा गवांडे मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; धक्कादायक कारण समोर

करमाड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास रक्ताचा सडा पडला. आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी पंपावर राबणाऱ्या पूजा गवांडे या महिलेची तिचाच दुसरा पती सत्यम गवांडे याने अमानुषपणे हत्या केली. एका बाजूला लग्नानंतर विभक्त राहणारे पती-पत्नी आणि दुसऱ्या बाजूला घटस्फोटासाठी असणारा अट्टाहास, या वादाचा शेवट एका भीषण हत्याकांडात झाला.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पूजा यांचा हा दुसरा संसार होता. पहिल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी सत्यमसोबत आळंदीत लग्नाची गाठ बांधली होती. पूजा यांना पहिल्या पतीपासून दोन मुलेही आहेत. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच या नात्यात दुरावा आला. सत्यमला आता तिसरे लग्न करायचे होते, त्यासाठी तो पूजाकडे घटस्फोटासाठी सतत तगादा लावत होता. मात्र, पूजाने समाजाचा आणि मुलांच्या भविष्याचा विचार करून साथ सोडण्यास नकार दिला.

घटस्फोटाला नकार मिळत असल्याने सत्यमच्या डोक्यात सूडाचे चक्र सुरू होते. आज गुरुवारी पूजा पेट्रोल पंपावर आपल्या कामात व्यस्त असताना सत्यम तिथे पोहोचला. काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि सत्यमने जवळ असलेला धारदार चाकू काढून पूजा यांच्या गळ्यावर भीषण वार केले. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक सुन्न झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजा यांचा जागीच प्राण गेला.

चित्तेपिंपळगाव इथं राहणारी पूजा सुदाम गावंडे ही तरुणी करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर आपली ड्युटी करत होती. दुपारी १२:३० च्या सुमारास, जेव्हा महामार्गावर मोठी वर्दळ असते, तेव्हा आरोपीने अचानक पूजावर हल्ला चढवला. काही समजण्याच्या आतच त्याने चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. पूजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच प्राण गेला.

घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा करमाड पोलिसांनी अत्यंत वेगाने शोध घेतला. तांत्रिक माहिती आणि खबर मिळताच पोलिसांनी अवघ्या ६० मिनिटांच्या आत सत्यम गवांडे याला बेड्या ठोकल्या. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि त्यामागचे सविस्तर कारण याचा तपास पोलीस करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें