घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कमी दराच्या निविदांबाबत महापालिका आखणार धोरण

शहरातील विविध विकासकामांसाठी अंदाजपत्रकापेक्षा अत्यंत कमी दराने निविदा सादर करण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका स्थायी समितीने कमी दराच्या निविदांबाबत ठोस नियमावली व धोरण तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

महापालिकेतर्फे दरवर्षी रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि बांधकामाची कामे राबवली जातात. अनेक वेळा कंत्राटदार या कामांच्या पूर्वणगणनपत्रकापेक्षा ५० टक्केपर्यंत कमी दराने निविदा भरतात. इतक्या कमी दरात काम करताना गुणवत्तेशी तडजोड होण्याची शक्यता दक्षता समितीनेही यापूर्वी वर्तवली होती. यामुळे महापालिकेला भविष्यात आर्थिक भार सहन करावा लागू शकतो, अशी भीती सदस्यांनी बैठकीत व्यक्त केली.

स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. केवळ कमी दर विचारात न घेता गुणवत्ता, अनुभव आणि तांत्रिक पात्रतेवर आधारित पारदर्शक प्रणाली विकसित करण्याची मागणी सदस्यांनी केली.

यावर आयुक्त नवल किशोर राम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येईल आणि ही समिती दर्जा व सुधारणांबाबतचा अहवाल लवकरच सादर करेल, असे आश्वासन राम यांनी दिले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें