घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षात त्यांचे साहित्य प्रकाशित करा : उपमहापौर परशुराम वाडेकर

पुणे : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त देशभर व राज्यभर विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. मात्र, या महत्त्वाच्या वर्षातही महात्मा फुले यांचे समग्र साहित्य शासनाच्या वतीने प्रकाशित झाले नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत तीव्र खंत व्यक्त करत पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उद्या महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शासकीय फोटो झिंको तसेच संबंधित शासकीय विभागांकडून महात्मा फुले यांच्या साहित्याची मागणी करण्यात आली असता, असे कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

यामुळे संताप व्यक्त करत वाडेकर यांनी संबंधित विभागाने तातडीने महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय तसेच त्यांच्याशी संबंधित सर्व साहित्य प्रकाशित करावे, अशी मागणी केली आहे.तसेच, राज्य शासनाच्या प्रकाशन विभागाचे प्रमुख या नात्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून सर्व साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें