बीडच्या परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या शेतात औषध घेऊन गळफास्ट घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रामेश्वर याने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केली.
यामध्ये त्यांने त्याची पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याचे लिहिले आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आलाय.फेसबुक पोस्टनंतर त्याच्याशी अनेकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही.
काही वेळातच त्याच्या आत्महत्येची बातमी समोर आलीय.मात्र फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केल्यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.रामेश्वर गव्हाणे याने लिहिलेल्या फेसबुक पोस्टनंतर मोठी खळबळ उडाली आहे. रामेश्वर गेल्या काही दिवसापासून मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे.
रामेश्वरने आपल्या पोस्टमध्ये पत्नीकडून मारहाण होत असल्याचे देखील म्हटले आहे. तो म्हणाला, यापूर्वी ही ती मला मारहाण करून उखळीला गेली होती. तिने मला मारहाण केली तरी मी तिला काहीही केलं नाही. तिला माझ्याकडून पैसे घेऊन जायचे आहेत. या आधीच तिची मावशी आणि काका यांनी सोन्याचे ओरीजनल दागिने घेऊन गेले आहेत आणि हुबेहूब सोन्यासारखे दागिने तयार करून माझ्या घरी आणून ठेवले आहेत.
माझ्यावर सोन्याच्या चोरीचा आळ घालून किंवा इतर काही तरी कारणाने माझ्याकडून पैसे काढून घ्यायचे आहेत. रात्री मी झोपेत असताना मला घाबरवण्यासाठी अंगाला टच करते. चिमकुरे घेते, माझ्या जेवण मीठ, चटणी, मसाला जास्त टाकते अजून दुसरं काही तरी मिक्स करते ज्यामुळे मला काहीच कळत नाही काय होतं आहे ते. गेल्या दोन वर्षांपासून माझा अपमान करणं, मला शिव्या देणं, मला उचकावणं, माझ्यासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे करणं. स्वयंपाक जास्त करून ठेवणं. ज्यामुळे आईला नेहमी शिळीच भाकरी खावी लागल्यामुळे तिला पोटात दुखू लागले.
सुरूवातीला सुरेखालाही खालीवरी पाहत होती मात्र तिने फरशी पुसायचे औषधं पिल्यापासून तिने तिला त्रास देणं कमी केलं. हा माझा छळ सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत माझे नातेवाईक आहेत ते माझ्याकडून बोलत पण नाहीत कारण मी त्यांना जाब विचारला आहे. इतर कोणी मध्ये पडत नाही. त्याबरोबर त्यांनी फसवणूक केल्यामुळे त्यांना मला कसा त्रास होईल आणि मी कसा अडचणीत सापडेल किंवा मला जाळ्यात कसं पडायचं यासाठी ते प्रयत्नशील होते. यात त्यांनी माझे मित्र गळाला लावले.
मोबाईल फोन हॅक करणे असे प्रकार केले असू शकतात. मला त्रास द्यायचा भडकवायचे आणि दुसरीकडून मी भडकलो की रेकॉर्डिग करून घ्यायचे असे अनेक प्रकार त्यांनी केले आहेत. कारण ते सराईत आहेत. त्यांना त्यांचं पितळ उघडे पडू द्यायचे नाही. त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ते माझ्या मागे घात धुवून लागले आहेत.












