पुणे_ येथील जांभुळवाडी रोड वरील ज्येष्ठ नागरिक संघ जांभुळवाडी रोड !आंबेगांव खुर्द यांचे वतीने सर्व सभासदांच्या उपस्थीती मध्ये महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती निमित्त वसंतराव थोरात विरंगुळा केंद्रात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार,फुले अर्पुन विनम्र अभिवादन करण्यांत आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक,अध्यक्ष चंद्रकांत गुरव हे होते.अध्यक्षांच्या नावाची सुचना सचिव म्हाळसाकांत जोशी यानी मांडली त्यास उपाध्रक्ष संजय रणसिंग यानी तनुमोदन दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुरसम्राज्ञी कै.आशाताई भोसले यांच्या दु:खद निधना बद्दल २मिनिटे स्तब्धता पाळुन श्रद्धांजली वाहण्यांत आली.
याप्रसंगी सचिव म्हाळसाकांत जोशी,उपाध्यक्ष संजय रणसिंग,खजिनदार नितीन कुलकर्णी,सहसचिव वैजनाथ शेटे,कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तम देवगांवकर,चंद्रकांत फडतरे तसेच आजीव सभासद हिंदी कवी लेखक सत्येंद्रसिंह,दिलिप तोडकर,नामदेव पवार तसेच अध्यक्ष चंद्रकांत गुरव यांची डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणारी समयोचित भाषणे झाली.
या कार्यक्रमास दिलिप तोडकर,ज्ञानेश्वर वाघमारे,शाम पंडित,देवराम सातपुते,राजेंद्र क्षिरसागर, एस.एस.खटे,रामचंद्र कुलकर्णी, सतीश मंगरुळे यांचीही उपस्थिती होती.












