घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वेषांतर केलं अन्… नाशिक प्रकरणातली मोठी माहिती समोर

नाशिकमधील नामांकित कंपनीत महिलांचा लैंगिक छळ आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी ८ आरोपींववर ९ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास विशेष पोलीस पथकाकडून सुरू आहे. मागील दोन चार वर्षांत कंपनीतील महिलांवर शारीरिक अन्याय अत्यातार, धर्मांतराचा प्रयत्न, विशिष्ट उपवास करायला भाग पाडणे असे आदी प्रकार समोर आले आहेत.

पीडित मुली सुरुवातीला तक्रार करायला समोर येत नव्हत्या, मात्र समुपदेशन करून त्यांना तक्रारीसाठी तयार केले गेल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचं लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचे आरोप होत आहेत.

याच प्रकरणाची संपूर्ण देशभरात चर्चा आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या तपासाबद्दल सांगितले.संघटित गुन्हेगारी केल्याचे समोरपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, या सर्व प्रकरणांमध्ये आरोपींची साखळी दिसून येत आहे. हे केवळ वैयक्तिक गुन्हे नसून एक संघटित गुन्हेगारी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

यामध्ये धर्मांतरणाचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणं आणि नोकरीचे आमिष दाखवून बलात्काराचा प्रयत्न असे गंभीर आरोप आहेत.महिला तक्रार करायला घाबरत होत्या, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वेषांतर केलं अन्…पीडित महिला आरोपींच्या धाकामुळे तक्रार देण्यास घाबरत होत्या. अशा वेळी नाशिक पोलिसांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलले.

महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने वेशांतर करून कंपनीतील महिलांशी संवाद साधला, त्यांचे मनोबल वाढवले आणि त्यांना सुरक्षिततेची खात्री दिली. त्यानंतरच या पीडितांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवल्या. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

या आरोपींना कोणत्या कट्टरपंथी संघटनांचा पाठिंबा आहे का? त्यांना बाहेरील देशांतून फंडिंग (निधी) मिळत होते का? त्यांचे इंटरनॅशनल लिंक्स काय आहेत? या सर्व बाबींच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी, एटीएस आणि एनआयए यासारख्या उच्चस्तरीय यंत्रणांशी पत्रव्यवहार केला आहे.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, कंपनीची ऑपरेशनल मॅनेजर अश्विनी चेनानी हिने पीडित महिलांनी तक्रार करूनही त्यांना न्याय दिला नाही, उलट तिने आरोपींना पाठीशी घातले. दुसरी आरोपी निदा खान सध्या फरार असून तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. नाशिक पोलिसांचे पथक निदा खान हिच्या मागावर असून लवकरच आम्ही तिला पकडू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें