घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘महावतार नरसिंह’चा भव्य मराठी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर

प्रेक्षकांसाठी नेहमीच दर्जेदार आणि आशयघन मनोरंजन सादर करण्याची परंपरा जपणारी सोनी मराठी वाहिनी आता एक भव्य आणि आध्यात्मिक अनुभव घेऊन येत आहे.

समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेल्या ‘महावतार नरसिंह’ या ॲनिमेटेड चित्रपटाचा मराठी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर रविवार १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर होणार आहे.

वर्षातला सर्वाधिक गाजलेला आणि या वर्षातला बेस्ट ॲनिमेटेड सिनेमा पुरस्कारानं सन्मानित झालेला हा चित्रपट आता मराठी प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर येत आहे. नेत्रदीपक ॲनिमेशन, प्रभावी कथानक आणि भावनिक सादरीकरण यांमुळे सर्व वयोगटांतल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अनुभव हा चित्रपट देईल.

भारतीय पौराणिक कथांवर आधारित ‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट श्रद्धेची, न्यायाची आणि दैवी शक्तीची गाथा प्रभावीपणे मांडतो. भगवान नरसिंहांच्या अद्भुत अवताराची कथा अत्याधुनिक ॲनिमेशनच्या माध्यमातून साकारत हा चित्रपट ‘सत्याचा असत्यावर विजय’ हा सार्वकालिक संदेश देतो. मुलांपासून कुटुंबांपर्यंत आणि पौराणिक कथांच्या चाहत्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करणारा हा चित्रपट भव्यता आणि भावनिक खोली यांसाठी विशेष ठरतो.

प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून मिळालेल्या अफाट प्रतिसादानंतर आता महावतार नरसिंह मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे… सोनी मराठी वाहिनीच्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आशय सादर करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत…!पाहा ‘महावतार नरसिंह’चा मराठी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर रविवार १९ एप्रिलला, दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर…!

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें