घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आप वहीं हो ना… हाय-हॅलो नाही, मुलींना कसं अडकवायचा जाळ्यात, अयानचा सर्वात डेंजर प्लॅन समोर

मुली पटवण्यावरून लागलेली पैज आणि कॉलर टाइट करण्यासाठी जास्तीत जास्त मुलींना जाळ्यात ओढण्याचा डाव असल्याचं धक्कादायक सत्य अमरावतीच्या व्हिडीओ कांडमधून समोर आलं आणि महाराष्ट्र हादरला.

मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी तो हाय हॅलो नाही तर असे प्रश्न विचारायचा की ज्यामुळे मुलींना त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल.त्यामुळे संवाद होईल आणि मुलींना आपल्या जाळ्यात ओढणं आणखी सोपं होईल असा डाव होता.

परतवाडा इथे अयान अहमद याने विकृतीचा कळस गाठला. सोशल मीडियाचा वापर करून मुलींना जाळ्यात ओढणं, त्यांच्याशी अश्लील चाळे करून त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढले. मात्र पैशांवरून वाद झाल्यामुळे मित्रानेच हे फोटो व्हिडीओ व्हायरल केले आणि धक्कादायक कांड समोर आलं.

पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून तपासात एकापेक्षा एक मोठे खुलासे या प्रकरणात केले आहेत. पोलीस तपासात समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे.अयानने मुलींना पटवण्यासाठी लव्ह गुरूची मदत घेतली होती.

हा गुरू त्याला सांगायचा की, “मुलींना साधे हाय-हॅलो मेसेज करू नकोस, त्यांना असा प्रश्न विचार ज्याचं उत्तर देणं त्यांना भाग पडेल.” अयान मुलींना “आप वहीं हो ना, जो वहां मिले थे?” असे मेसेज करून बोलण्यासाठी सुरुवात करायचा. ओळख नसतानाही केवळ कुतूहलापोटी मुली उत्तर द्यायच्या आणि तिथूनच अयानच्या जाळ्यात अडकायच्या.

५०० रुपयांच्या पैजसाठी नको तो कांडअयानने केवळ मुलींना जाळ्यात ओढलं नाही, तर त्यांच्यावर लैंगिक अत्याचारही केले. किती मुली पटवल्या याचे पुरवे म्हणून त्याने मुलींसोबतचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले. या सगळ्यासाठी अमरावती शहरातील एका फ्लॅटचा वापर केला. हा फ्लॅट त्याला मानव सुगंधी नावाचा तरुण देत होता अशी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, अयान आणि मानव यांची थेट ओळख नव्हती.पियुष नावाच्या एका मध्यस्थाच्या माध्यमातून अयानने मानवशी संपर्क साधला होता. प्रत्येक भेटीसाठी अयान मानवला ५०० रुपये द्यायचा. गेल्या वर्षभरात ७ ते ८ वेळा अयानने या फ्लॅटचा वापर केला होता. पोलिसांनी १६ एप्रिल रोजी मानव सुगंधीलाही अटक केली.

अयानकडून व्हिडिओ त्याचा मित्र उझैर खानकडे गेले, तिथून मो. साद आणि पुढे तरबेज खानपर्यंत पोहोचले. उझैर खानकडून हे व्हिडिओ ऐफाज खान, मोहम्मद इम्रान आणि शेख नावेदपर्यंत पोहोचले.

हे व्हिडिओ आणखी किती जणांच्या मोबाईलपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास आता सायबर पोलीस करत आहेत. अमरावतीतील २ आणि परतवाड्यातील ३ अशा एकूण ५ कॅफेंमध्ये अयानने मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचे समोर आले आहे. पोलीस आता या पाचही कॅफेंवर जाऊन पंचनामा करत असून, अशा प्रकारांना पाठबळ देणाऱ्या कॅफे मालकांचेही धाबे दणाणले आहेत.

या प्रकरणाला आता राजकीय वळणही मिळाले आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी आरोपींचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी कडाडून टीका केली आहे. “नवनीत राणा अफवा पसरवून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर पोक्सोअंतर्गत कारवाई करा,” अशी खळबळजनक मागणी खान यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें