घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*खेळाडूंच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल सध्या अस्वच्छतेमुळे विद्रूप अवस्थेत गेले असून, यामुळे खेळाडू व नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. क्रीडा संकुल परिसरात जागोजागी कचरा साचला असून, नाल्यांमध्ये गवत व झाडेझुडपे वाढल्याने सापांचा वावरही वाढला आहे. या परिस्थितीमुळे येथे सरावासाठी येणाऱ्या धावपटू, खेळाडू तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या क्रीडा संकुलात पिंपरी-चिंचवड शहरातील ८०० मीटरचा एकमेव सिंथेटीक अॅथलेटिक्स ट्रॅक आहे. त्यामुळे शहरातील अनेक धावपटू, खेळाडू नियमित सरावासाठी येथे येतात. मात्र, ट्रॅकच्या आजूबाजूला पालापाचोळा, कचऱ्याचे ढीग, तसेच दुरुस्तीवेळी उरलेला राडारोडा तसाच पडून असल्याने अस्वच्छतेत भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली होती, परंतु त्या वेळी साचलेला राडारोडा अद्यापही उचलण्यात आलेला नाही.

क्रीडा संकुलातील प्रेक्षा गॅलरीमध्ये पाण्याच्या व मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. ट्रॅकच्या कोपऱ्यांमध्ये कचरा साचलेला असून, नाल्यांमध्येही कचऱ्याचा ढीग दिसून येतो. विशेष म्हणजे, याच क्रीडा संकुलात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. तरीदेखील परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने खेळाडू आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या संदर्भात ‘क’ प्रभागाचे सहायक आरोग्य अधिकारी तानाजी दाते यांनी सांगितले की, “संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्स ट्रॅक परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे आहे. स्पर्धांच्या वेळी आरोग्य विभागामार्फत स्वच्छता करून दिली जाते, मात्र नियमित स्वच्छतेची जबाबदारी क्रीडा विभागाचीच आहे.

”दरम्यान, या प्रकाराची दखल घेत महापालिकेचे क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी आश्वासन दिले आहे की, “इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्स ट्रॅक व परिसराची तातडीने स्वच्छता करून घेतली जाईल. तसेच क्रीडा संकुल परिसराच्या नियमित स्वच्छतेकडेही लक्ष दिले जाईल.”खेळाडू व नागरिकांनी महापालिकेकडून तात्काळ आणि नियमित स्वच्छता मोहिम राबवावी, तसेच क्रीडा संकुलाची देखभाल योग्य पद्धतीने करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा खेळाडूंच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें