दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी उन्नती सोशल फाउंडेशनच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले.नगरसेविका डॉ. कुंदा भिसे, फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, कैलास कुंजीर, वाल्मीक काटे, ऑल सीनियर सिटीझन असोसिएशन, लिनियर गार्डन ज्येष्ठ नागरिक संघ, नवचैतन्य हास्य परिवार, आनंद हास्य क्लब, विठाई वाचनालय यांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, प्रशासकीय व विकासाभिमुख कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.












