घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

TCS प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी वकिलांचा आटापिटा, जोरदार युक्तिवाद

नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील संशयित शफी शेख आणि रझा मेमन या दोघांना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

न्यायमूर्ती आर सी नरवडिया यांच्यासमोर ही सुनावणी झाली. न्यायालयात इन-कॅमरा ही सुनावणी झाली.नाशिक TCS प्रकरणात जप्त केलेल्या मोबाईल प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक असून गुन्ह्याच्या तपासात प्रगती आहे.

आरोपींना समोर बसवून मोबाईल डाटा तपासायचा आहे. प्रत्येक अॅपला स्वतंत्र पासवर्ड टाकले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि असे इतर अॅपमध्ये महत्त्वाच्या चॅटिंग आहे. आरोपींनी आणखी कुणाला असं फसवल आहे का? हे तपासण्यासाठी सरकारी वकिलांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

अटक आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड मिळण्याची 5 कारणे काय?

१. सदरचा गुन्हा हा महिला संदर्भात असून काम करत असलेल्या ठिकाणी विनयभंग व लैंगिक शोषण असा गंभीर स्वरूपाचा असल्याने सखोल तपास सुरू आहे.

२. सदर गुन्ह्यात लावण्यात आलेल्या कलमांमध्ये आरोपी यांनी भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 78 अन्वये फिर्यादींचा चोरून पाठलाग केला आहे. फिर्यादिंनी स्पष्टपणे इच्छा नसल्याचे दर्शविले असताना देखील आरोपी यांनी वारंवार जवळीक साधून अश्लील वागणूक केली म्हणून गुन्ह्यात लावण्यात आलेल्या कलमांमध्ये भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 78 अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे. त्याबाबत सखोल तपास सुरू आहे.

३. सदर गुन्हयातील अटक आरोपी रझा रफिक मेमन याचा मोबाईल अं. कि. रु.१०,०००/- किं. चा. सॅमसंग ए १६ कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी शफी भिकन शेख याने गुन्हयात वापरलेला वन प्लस कंपनीचा मोबाईल सिमकार्डसह हा यापूर्वी गुरन १६४/२०२६ बी. एन. एस कलम ७८,७९ ३(५) यामध्ये जप्त करण्यात आला असून सदर आरोपी यांचे मोबाईलचे गुन्ह्याचे अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करणे अत्यावश्यक असल्यामुळे त्याकरता आरोपी यांची फिजीकल कस्टडी अत्यावश्यक आहे.

४. गुन्हयातील फिर्यादी यांनी तपासादरयान यातील अटक आरोपी शफी भिकन शेख याने फिर्यादी यांना जवळीक साधण्याच्या अनुषंगाने व्हॉटसअपद्वारे केलेला मॅसेजची स्क्रिनशॉट सादर केली आहे. त्या अनुषंगाने आरोपी शफी शेख याचा मोबाईलवे सखोल तांत्रिक विष्लेशन करणे बाकी असून सदर मोबाईल हा यापूर्वी गुरक १६४/२६ वा गुन्हयातुन नमूद गुन्हयाच्या अनुषंगाने प्राप्त करुन आरोपी स मोबाईल रिओपन पंचनामा करणे बाकी आहे, त्याकरीता आरोपीची फिजिकल कस्टडी अत्यावश्यक आहे.

५. आरोपांची सदर गुन्ह्याचे अनुषंगाने त्यांचे बँक खात्याबाबत माहिती, सोशल मिडीया अकाऊंट बाबत तपास करणे आहे. आरोपी यांनी ते काम करत असलेल्या कार्यालयामध्ये काम करणारे पुरूष व महिला यांला धार्मिक उपदेशाने गैरकृत्य केले आहे, तसेच महिलांची लैंगिक छळ करून विनयभंग केला आहे. त्याबाबत मुंबईनाका पोलीस स्टेशन चेथे खालीलप्रमाणे विविध गुन्हे दाखल आहेत. त्याअनुषंगाने वरिष्ठांचे सूचना आणि मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक रवाना करण्यात आले आहे. सदर गुन्हयांची व्यप्ती मोठी असुन त्याबाबत अटक आरोपींना विश्वासात घेऊन तपास करणार आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें