.
कुरकुंभ (ता. दौंड) येथील दौंड–बारामती मार्गावरील कुरकुंभ घाटात डाव्या बाजूस क्रॅश बॅरियर नसल्यामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रशासनाने घाटात क्रॅश बॅरियर आणि तटबंदी बसविण्याचे काम पूर्ण केले आहे.
या मार्गावरून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या तरुणांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर दररोज वर्दळ असते. तसेच अवजड आणि मोठ्या वाहनांची वाहतूकही सातत्याने सुरू असते. मात्र घाटाच्या शेवटच्या टोकाला आवश्यक असलेली सुरक्षात्मक क्रॅश बॅरियर नसल्याने वाहन घसरणे किंवा खोल दरीत जाण्याची शक्यता वाढली होती.
या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधत २२ डिसेंबरच्या अंकात घाटात तातडीने क्रॅश बॅरियर बसवण्याची गरज असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाल करत आवश्यक सुरक्षेची उपाययोजना पूर्ण केली आहे.
क्रॅश बॅरियर आणि तटबंदी बसविल्यामुळे आता या मार्गावरील प्रवाशांचा जीवितधोका मोठ्या प्रमाणात कमी होणार असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनासह आभार मानले आहेत.












