ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या पत्नी आणि आईचे मॉर्फ केलेले न्यूड फोटो पाठवून एका तरुणाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही घटना १६ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ दरम्यान ऑनलाइन माध्यमातून घडली.
याबाबत एका व्यक्तीने रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी ऋषीकेश शिंदे (रा. हिंजवडी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फिर्यादी, त्यांची होणारी पत्नी आणि त्यांच्या मित्रांना फिर्यादीच्या होणाऱ्या पत्नीचे व आईचे न्यूड फोटो पाठवले.
हे फोटो काही पॉर्न वेबसाईटवर अपलोड करून तेथून काढून टाकण्यासाठी त्याने पाच लाख रुपयांची मागणी केली. या कृत्यामुळे फिर्यादीच्या कुटुंबाची बदनामी झाली आहे. रावेत पोलीस तपास करत आहेत.












