घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून तरुणाची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांकडून नऱ्हे पोलिसांकडून एका तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एका तरुणाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण नऱ्हे परिसरात राहायला आहे. त्याने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती.

विवाहविषयक संकेतस्थळावरुन त्याची तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर तरुणीने त्याला जाळ्यात ओढले.शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष तरुणीने त्याला दाखविले.

त्यानंतर तरुणीच्या बँक खात्यात तक्रारदार तरुणाने साडेपाच लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर तरुणाला परतावा मिळाला नाही. त्याने तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळखीतून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. विवाहविषयक संकेतस्थळावर नाेंदणी करताना खातरजमा करणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें