वाई | प्रतिनिधी

पंचायत समिती शेंदुरजणे गण सौ. वर्षा लालसिंग जगताप

जिल्हा परिषद बावधन गट सौ. ऋतुजा विराज शिंदे
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून, प्रत्येक गावामध्ये प्रत्यक्ष गावभेटी देत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे.
बावधन जिल्हा परिषद गटातून सौ.ऋतुजा विराज शिंदे व शेंदुरजणे पंचायत समिती गणातून सौ. वर्षा लालसिंग जगताप या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार असू1न, त्यांच्या प्रचाराला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विकासकामांचा लेखाजोखा मांडत व जनतेच्या समस्या समजून घेत उमेदवारांकडून विश्वासार्ह प्रचार केला जात आहे.
दोन्हीही उमेदवारांनी सांगितले की,
“आम्ही आतापर्यंत केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्हाला निश्चित विजयाचा आत्मविश्वास आहे. जनतेने दिलेला पाठिंबा आणि प्रेम हेच आमच्या कार्याची खरी पावती आहे.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की,
“आमचे नेते नामदार मकरंद आबा पाटील व राज्यसभा सदस्य नितीन काका पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली या संपूर्ण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणे, मूलभूत सुविधा सक्षम करणे आणि प्रशासनात पारदर्शकता राखणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट राहील.”
सध्या संपूर्ण परिसरात प्रचाराला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या “काम करत आलोय… काम करत राहू!” या घोषवाक्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.











