वाई : येथील ऐतिहासिक परंपरेला साजेसा उपक्रम राबवत सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दि. २५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत द्रविड हायस्कूल येथे दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये ७ ते ६० वर्षे वयोगटातील मुले, मुली तसेच महिलांना स्वसंरक्षण, स्वयंशिस्त आणि शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. लाठी-काठी, दांडपट्टा आणि तलवारबाजी यांसारख्या पारंपरिक शस्त्रांचे प्रशिक्षण अनुभवी प्रशिक्षकांकडून शास्त्रोक्त व सुरक्षित पद्धतीने दिले जाणार आहे.
यासोबतच दररोज ऐतिहासिक विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार असून, महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा प्रयत्न या शिबिरातून केला जाणार आहे.
या शिबिरासाठी प्रवेश शुल्क ५०० रुपये ठेवण्यात आले असून, प्रशिक्षक म्हणून ह.भ.प. अशोक महाराज पवार मार्गदर्शन करणार आहेत.
मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी नोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी हिंदुराव गोळे (मो. ७७७४९२१२७३) यांच्याशी संपर्क साधावा.
महाराष्ट्राच्या पराक्रमशाली इतिहासाची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.












1 thought on “वाईत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन (वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे)”
धन्यवाद थोरवे सर.आपला खूप आभारी आहे.🙏🏻🚩
सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान तर्फे आपले धन्यवाद आणि आभार.
असेच शिबीर चालू झाल्यावरही आपलं सहकार्य असावे.
धन्यवाद 🙏🏻