ज्ञानदीपच्या विद्यार्थ्यांचे मंथन राज्यस्तरीय स्पर्धेत उज्वल यश
(वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे )
सन 2025.- 26 मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत ,ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज वाई च्या विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल यशाची परंपरा यावर्षीही अखंड ठेवली आहे. यावर्षी राज्यात एकूण 13 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच या मुलांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका माध्यमिक विभाग कु. शुभांगी लक्ष्मण पवार ,सौ. शीला महेश खाडे ,सौ. निशा शेखर बाबर ,सौ वैशाली संदीप वाडकर तसेच प्राथमिक विभाग सौ. स्वप्ना योगेश गिजरे, सौ. अर्चना महादेव जाधव व सौ. कार्तिकी अतुल जायगुडे यांचे अभिनंदन विद्यावर्धिनी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. एकनाथ जगताप , उपाध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत ढमाळ ,सचिव मा. श्री. बाळकृष्ण पवार , खजिनदार मा.श्री. चंद्रकांत शिंदे, विश्वस्त मा. श्री. विश्वनाथ पवार, मा. श्री. जिजाबा पवार, मा.प्राध्यापक श्री. दत्तात्रय वाघचवरे, मा. श्री. दिलीप चव्हाण, मा. श्री. विजय कासुर्डे, , मा.श्री. रविंद्र केंजळे, मा. श्री. दुष्यंत जगदाळे. मा. पत्रकार श्री. दत्ता मर्ढेकर , व प्राचार्या कु. शुभांगी लक्ष्मण पवार यांनी केले.
मंथन परीक्षेत कु . सानवी मनोज आगरकर (इयत्ता पहिली) राज्यात 11वी, कु .शिवाई अभिजीत शिंदे ( इयत्ता पहिली) राज्यात 21 वी, कु. रुही राहुल गोळे (इयत्ता दुसरी )राज्यात 13 वी, कु. ओवी अभिजीत मालुसरे (इयत्ता दुसरी )राज्यात 21 वी, कु .श्रेया मंगेश कोचळे (इयत्ता दुसरी )राज्यात 25 वी , कु अद्वैत शशांक कांबळे ( इयत्ता तिसरी) राज्यात 39 वा , कु आदिती रवींद्र यादव (इयत्ता तिसरी)राज्यात 42 वा , कु .मोहित पायडीपाटी( इयत्ता चौथी) राज्यात 28 वा, कु .आयुष सुधीर जगताप (इयत्ता चौथी) राज्यात 30 वा, कु. श्रेयस श्रीकांत ढगे ( इयत्ता पाचवी) राज्यात 21 वा, कु .सोहम सचिन पेटकर ( इयत्ता पाचवी) राज्यात 26 वा , कु. राशी प्रवीण माने ( इयत्ता सहावी ) राज्यात 32 वी , कु. अनन्या अमोल मालुसरे ( इयत्ता सहावी ) राज्यात 35 वी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व पदाधिकारी, विश्वस्त, प्राचार्या, पालक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.











