घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

स्त्री शक्तीचा गौरव सोहळा | पुण्यात ‘स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६’ वार्षिक अंकाचे उत्साहात स्वागत

पुणे प्रतिनिधी : अमर पठारे
महिलांच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने ‘स्त्री शक्ती मंच’ तर्फे दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ‘स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६’ या वार्षिक अंकाचे स्वागत पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडले. नगरसेविका स्वप्नाली ताई पंडित यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन होऊन कार्यक्रमाला एक विशेष उंची प्राप्त झाली.
छत्रपती संभाजीनगरातून सुरू झालेला हा साहित्यिक उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारला असून, विविध क्षेत्रातील महिलांना एकत्र आणणारा एक समृद्ध आणि प्रेरणादायी परिवार म्हणून ओळख निर्माण करत आहे. ‘स्त्री शक्ती मंच’चा हा सलग चौथा अंक असून, मुख्य संपादक चंद्रकांत तायडे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांतील कार्यकारी संपादकांनी यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
या अंकामध्ये शंभरहून अधिक साहित्यिकांचे लेखन प्रकाशित झाले असून, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या यशोगाथांचा प्रभावी आढावा यात मांडण्यात आला आहे. स्त्रीची जिद्द, संघर्ष आणि तिच्या अटळ शक्तीचा गौरव करणारे लेख या अंकाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
पुणे जिल्ह्याच्या वतीने शनिवार पेठ, काळा हौद येथील प्रख्यात साहित्यिक मा. मधुसूदन घाणेकर यांनीही या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच पुणे जिल्ह्याच्या कार्यकारी संपादक व प्रसिद्धी प्रमुख सौ. वसुधा वैभव नाईक यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी स्वप्नाली ताई पंडित यांनी संपूर्ण उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, “स्त्रीच्या सामर्थ्याला शब्दरूप देणारा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहे,” असे सांगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें