घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

माध्यमिक शालांत परीक्षेत द्रविड हायस्कूलचे उत्तुंग यश.इयत्ता दहावीचा ९८.९८ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी (वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे )

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित द्रविड हायस्कूल, वाई या विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल तब्बल ९८.९८ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शाळेतून एकूण २९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्कृष्ट निकालामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुणवत्तेच्या बाबतीतही विद्यार्थ्यांनी विशेष चमक दाखवली आहे. ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे १४ विद्यार्थी तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ३९ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. तसेच संस्कृत विषयात १८ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले. समाजशास्त्र, गणित आणि विज्ञान या विषयांतही विद्यार्थ्यांनी शतप्रतिशत गुण मिळवत शाळेची मान उंचावली आहे.
शाळेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
🥇 कु. जोशी शर्वरी उत्तम — ४९९ गुण (९९.८०%)
🥈 कु. वाडकर प्रज्ञा धोंडीराम — ४९४ गुण (९८.८०%)
🥈 कु. भोमे आसावरी श्रीपाद — ४९४ गुण (९८.८०%)
🥉 चि. क्षीरसागर अवनिश नवनाथ — ४९३ गुण (९८.६०%)
🏅 कु. रासकर श्रावणी संदीप — ४९२ गुण (९८.४०%)
🏅 चि. घागरे प्रज्वल शिवाजी — ४८९ गुण (९७.८०%)
संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
चि. अथर्व अभिजीत राजा पुरे,
कु. प्रज्ञा धोंडीराम वाडकर,
कु. सानिका मारुती मांढरे,
कु. श्रावणी संदीप रासकर,
चि. श्लोक सूर्यकांत नवघणे,
कु. श्रद्धा दिलीप शिंदे,
चि. श्रेयस शिवाजी वाडकर,
कु. सलोनी मोतीराम उबाळे,
कु. वैभवी सुनील पवार,
कु. अनुष्का सुरेंद्र इथापे,
कु. विभावरी संजीव कळंबे,
चि. परशुराम मल्लिनाथ कोळी,
कु. सुहानी अंगद करपे,
चि. प्रज्वल शिवाजी घार्गे,
कु. जान्हवी सुधीर चव्हाण,
कु. उज्मा मुनाफ बागवान यांनी विशेष प्राविण्य संपादन केले.
तसेच कु. जोशी शर्वरी उत्तम हिने संस्कृत, समाजशास्त्र व गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले असून कु. भोमे आसावरी श्रीपाद हिने संस्कृत व विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.
शाळेच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे दैदिप्यमान यश संपादन करता आले, अशी भावना शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केली.
वरील यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाला समिती अध्यक्ष श्री. नितीन पोरे, डे. ए. सोसायटी पुणेचे विश्वस्त श्री. अनंत जोशी, शालेय समिती सदस्य श्री. अमित कुलकर्णी, श्री. सारंग कोल्हापुरे, मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय भोसले, उपमुख्याध्यापिका सौ. नेत्रा मुळे, पर्यवेक्षक श्री. घनश्याम नवले तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें