घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*लोणीकंदच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे हृदयविकाराने निधन

लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी मध्यरात्री दोन वाजता निधन झाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते सध्या वडगावशेरी येथे राहत होते.

शनिवारी रात्री १० वाजता ते ड्यूटी संपवून वडगावशेरी येथील घरी गेले. मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. लोणीकंद पोलिस ठाण्याचा त्यांनी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी पदभार स्वीकारला होता.

पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या नियोजनाची व सुरक्षिततेची जबाबदारी त्यांनी सलग दोन वर्ष संभाळली. नुकतेच वाघोलीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक युवराज हांडे हे सुट्टीवर असताना त्यांच्याकडे २५ ते २७ जानेवारी या तीन दिवसात वाघोली व लोणीकंद या दोन्ही पोलिस ठाण्याची जबाबदारी होती.

त्यांच्याकडे वाघोलीचा तात्पुरता चार्ज असताना नेमके याच तीन दिवसांत वाघोलीत दोन खुनाच्या घटना घडल्या. त्यातील आरोपींना त्यांनी तत्काळ अटक करून कायदा व सुव्यवस्था राखत आपली कामगिरी दाखवून दिली.त्यांना २०२५ मध्ये सुरक्षित पुणे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते अत्यंत शांत व संयमी स्वभावाचे अधिकारी होते. अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर कायम हसतमुख असायचे. त्यांच्या या अचानक जाण्याने पोलिस दलात व वाघोली- लोणीकंद परिसरात खूपच हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या मागे आई, एक मोठा भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मुलगा सिद्धेश व मुलगी सिद्धी दोघेही शिक्षण घेत आहेत. मुलगी सिद्धी ही बीएएमएसचे शिक्षण घेत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें