घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*मुलीला संपवण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार

पती, मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार केला असून याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.त्यानुसार गुरु दोडमणी ( २५), मयुर ( २६), दीपक काटकर ( २४, सर्व रा.लिपाणे वस्ती, सदगुरु हॉस्पिटलमागे, आंबेगाव खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

२३ वर्षीय पीडित महिला, पती, लहान मुलगीसह आंबेगाव परिसरात राहायला आहेत. आठ महिन्यांपूर्वी आरोपी दोडमणी महिलेचा पती घरात नसताना गेला. महिलेचा पती आणि मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या महिलेने याची माहिती कोणाला दिली नाही.

त्यानंतर आरोपी दोडमणीने महिलेला धमकावून पुन्हा बलात्कार केला.दोडमणीचे मित्र मयूर आणि दीपक हेही महिलेच्या घरी गेले. तुझी बदनामी करेन, अशी धमकी आरोपींनी तिला दिली. महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने अखेर आंबेगाव ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघे आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें