शिरवळ प्रतिनिधी : संदेश चव्हाण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एस.एस.सी. मार्च 2026 बोर्डाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये शिरवळ येथील ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालयाचा निकाल हा 99.32%टक्के लागला आहे. याहीवर्षी ज्ञानसंवर्धिनी विद्यालयाने गुणवत्तेमध्ये बाजी मारली असून निकालाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवली आहे.यामध्ये चि. श्लोक दत्तात्रय बाठे याने 97.40 टक्के गुण मिळत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. कु. श्रावणी मनोज सावंत 96.40 टक्के गुण मिळवत द्वितीय, चि. अंकुर अनंत माळी 95.60. टक्के गुण मिळवत तृतीय, विद्यालयातून यावर्षी 149 विद्यार्थी एस.एस.सी. परीक्षेसाठी प्रविष्ट झाले त्यापैकी 148 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकालामध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे तब्बल 26 विद्यार्थी आहेत. ज्ञानसंवर्धिनी इंग्रजी माध्यम शाळेचा निकाल 100 टक्के लागला असूनकु. स्नेहा संतोष समगीर 99.20 टक्के गुण मिळवून प्रथम, कु. तनवी हरिदास काशीद 98.60 टक्के द्वितीय, कु. गार्गी राहुल शुक्ल 98.40 तृतीय क्रमांक मिळवला आहे.

या विभागातून 50 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आणि सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. 100% निकालाची परंपरा अखंडपणे कायम ठेवली आहे .50 पैकी 15 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत त्याबद्दल. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन डॉ. विनय जोगळेकर, सचिव श्री. रमेशजी देशपांडे सर, श्री. ईश्वरभाई जोशी, सर्व संचालक ज्ञानसंवर्धिनी शिक्षण संस्था, शिक्षण समन्वयक श्री. नवले सर, मुख्याध्यापिका माने मॅडम. सौ. ढमाळ मॅडम, सौ. पवार मॅडम मुख्याध्यापक श्री. अजित गाढवे सर, सर्व शिक्षक वृंद, आणि कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.











