घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अमर एज्युकेशन सोसायटीच्या एस. पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व ज्ञान प्रसारक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता दहावी व बारावीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

पुणे प्रतिनिधी
अमर एज्युकेशन सोसायटीच्या एस. पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच ज्ञान प्रसारक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मान्यवर पदाधिकारी होते. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात डॉ. संजय राजाराम नायडू सर, प्राचार्य – बालाजी माध्यमिक विद्यालय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चांगला माणूस व्हा हा जीवनमूल्यांचा संदेश दिला. आई-वडील व गुरुजनांविषयी आदरभाव ठेवणे, तसेच परीक्षेला सामोरे जाताना योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि संयम या बाबींचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी डॉ. रमेश शेलार सर, डिव्हिजनल कलेक्टर (मनपा) यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनातील मेहनतीचे महत्त्व स्पष्ट केले. सातत्याने अभ्यास व परिश्रम केल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला आणि परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्याचा सल्ला दिला.या समारंभास प्राथमिक शाळा समितीचे सरचिटणीस माननीय रणजीत सर उपस्थित होते.
तसेच अमर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका माननीय मंगलताई सोकांडे यांनी परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबी, अभ्यासाचे नियोजन आणि अभ्यासाला प्राधान्य देण्याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापक अमर सोकांडे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्ड परीक्षांसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली, तर शिक्षकवृंदांनीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय ठरला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें