पुणे प्रतिनिधी : शांताराम लांघे
शिवगंगा खोरे कल्याण, घेरा सिंहगड भिलारवाडी गावात दरवर्षी सालाबादप्रमाणे यंदाही दि.28/1/2026रोजी श्री.गुरुजी बुवा भंडारा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.हा एक दिवसीय भंडारा महोत्सव साजरा करण्यात येतो.सकाळी श्री.गुरुजी बुवा अभिषेक नंतर सत्यनारायण महापूजा करण्यात आली होती. सर्व पंचक्रोशीतील तरुण मंडळीने गावात जाऊन भिक्षा मागून आणण्याची एक रुढ, परंपरा आहे. या वेळी सर्व तरुण मंडळी गावात, प्रत्येक घरात जाऊन भिक्षा मागून आणतात.या. वेळी कल्याण गाव भजनी मंडळ लहान मुलांनी भिक्षा दिंडी आयोजन केली होते. ही कौतुकाची बाब व विशेष आकर्षण ठरले.संध्याकाळी महाप्रसाद,झाला.रात्री नऊ वाजता किर्तन सोहळा संपन्न झाला या वेळी श्री.गुरुजी बुवा भंडारा महोत्सव ह.भ.प. अर्जून महाराज मोटे पळशीकर किर्तन सेवा लाभली होती.श्री गुरुजी बुवा भंडारा महोत्सव विद्युत रोषणाई फुलांची सजावट ग्रामपंचायत सदस्य संदीप रेणुसे व नरवीर तानाजी मालुसरे मित्र मंडळ भिलारवाडी यांनी केली होती.विशेष असे सहकार्य कल्याण, माळवाडी,राहटावडे,मोरदरीवाडी कोंढणपुर भजनी मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भिलारवाडी तरूण मंडळ घेरा सिंहगड यांनी केले होते.अशी माहिती ह.भ.प.आमोल मोरे यांनी माहिती दिली आहे.











