घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कात्रज ई गटाची निवडणूक संशयाच्या भोवऱ्यात

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर–आंबेगाव कात्रज येथील ई गट निवडणूक निकाल जाहीर झाला असला, तरी या निकालाबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात येत आहेत. ईव्हीएमद्वारे पार पडलेल्या मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लोकशाही प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करत ठाकरे गटाचे उमेदवार वसंत मोरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेची दखल घेत स्मॉल कॉझेस कोर्ट, पुणे यांनी ई गटातील सर्व संबंधित उमेदवारांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

१२ फेब्रुवारीला न्यायालयीन सुनावणी

न्यायालयाच्या आदेशानुसार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सर्व संबंधित उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले असून, निवडणूक प्रक्रियेची बारकाईने तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या उमेदवारांना बजावली नोटीस

न्यायालयाकडून पुढील उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे

प्रशांत कांबळे – आम आदमी पार्टी

प्रकाश कदम – राष्ट्रवादी काँग्रेस (AP गट)

व्यंकोजी खोपडे – भारतीय जनता पार्टी

स्वराज बाबर – शिवसेना (शिंदे गट)

अक्षय निंबाळकर – भारतीय शेतकरी कामगार पक्ष

शहाबाज खान – अपक्ष

तुकाराम गोगावले – अपक्ष

विराज सोले – अपक्ष

नरेंद्र पारखे – वंचित बहुजन आघाडी

या सर्व उमेदवारांची भूमिका आणि न्यायालयीन उपस्थिती १२ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे.

आपचे उमेदवार प्रशांत कांबळेंची प्रतिक्रिया

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पार्टीचे उमेदवार प्रशांत कांबळे यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर दिला. ते म्हणाले,“लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असली पाहिजे. या प्रभागातील नागरिक मूलभूत सुविधांच्या अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. त्या प्रश्नांविरोधात आम्ही निवडणूक लढवली. मात्र मतदान प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंकांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. न्यायालयीन मार्गाने सत्य समोर यावे, हीच आमची मागणी आहे.”

निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर चर्चा

या प्रकरणामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित होत असून, काही उमेदवारांकडून ई गटाची निवडणूक पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत आधीच सुरू असलेल्या चर्चेला या घटनेमुळे नवे बळ मिळाले आहे.

लोकशाहीसाठी निर्णायक ठरणार प्रकरण

कात्रजमधील या निवडणूक वादामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता, तसेच ईव्हीएम प्रणालीबाबत जनतेचा विश्वास या मुद्द्यांवर व्यापक सार्वजनिक चर्चा सुरू झाली आहे. आता न्यायालयीन प्रक्रियेतून नेमके सत्य काय बाहेर येते, याकडे संपूर्ण पुणे शहराचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements

1 thought on “कात्रज ई गटाची निवडणूक संशयाच्या भोवऱ्यात”

Leave a Comment

और पढ़ें