घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे निवृत्त

पुणे महापालिकेच्या लोकप्रिय अधिकाऱ्यांत ज्यांची गणना होत आली असे , नगर अभियंता पदावर तब्बल तेवीस वर्षांहून अधिक काळ सेवा दिलेले प्रशांत वाघमारे महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले.

एकूण ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी शहर अभियंता म्हणून कामकाजाचा निरोप घेतला. त्यांच्या सेवामुक्तीनिमित्त महापालिकेतील शेकडो अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दीर्घकाळ एकत्र काम केलेल्या सहकाऱ्यांनी वाघमारे यांना निरोप देताना त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि नेतृत्वाचा विशेष उल्लेख केला.प्रत्यक्षात ते ३१ जानेवारी रोजी निवृत्त झाले , शनिवारी सुट्टी असल्याने शुक्रवारीच त्यांनी महापालिकेतील कामकाजाचा निरोप घेतला. त्यांच्या जागी पथ विभागप्रमुख म्हणून काम केलेले अनिरुद्ध पावसकर यांची नगर अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सीईओपी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या प्रशांत वाघमारे यांनी १९९० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये सेवेला सुरुवात केली. १९९३ मध्ये पुणे महापालिकेत उपअभियंता पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी पथ विभाग आणि भवन रचना विभागात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. कालांतराने शहर अभियंता पदावर त्यांची नियुक्ती झाली आणि त्या भूमिकेत त्यांनी शहराच्या पायाभूत विकासाला दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे नेतृत्व केले.

वाघमारे यांच्या कार्यकाळात पुणे शहरात उभ्या राहिलेल्या अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक इमारती आणि सांस्कृतिक केंद्रे त्यांच्या कामाची साक्ष देतात. कोरेगाव पार्कमधील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, गणेश कला क्रीडा केंद्र, नेहरू स्टेडियमचे नूतनीकरण, कमला नेहरू रुग्णालयाची विस्तारित इमारत, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन, चिखलवाडी येथील हॉकी स्टेडियम, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, महापौर बंगला आणि महापालिका भवनाची नवी इमारत हे प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली साकारले गेले. सध्या सुरू असलेली भिडे वाडा पुनर्विकास योजना आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारणीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे गेली.

सीवायजीच्या निमित्ताने शहरातील काँक्रीट रस्ते, बाणेर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण, बालेवाडी उड्डाणपुलाचे विक्रमी ६० दिवसांत पूर्ण झालेले काम, तसेच वारजे, वडगाव आणि होळकर पूल येथील अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्रे, मुंढवा जॅकवेल आणि भामा आसखेड धरणातून २०० एमएलडी पाणीपुरवठ्याचा प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, नदीकाठ सुधार प्रकल्प आणि जायका अंतर्गत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प या सर्व कामांमध्ये त्यांचे नेतृत्व निर्णायक ठरले.

कोरोनाच्या काळात बाणेर येथे अवघ्या २१ दिवसांत तीनशे खाटांची दोन रुग्णालये उभारण्याचे आव्हानात्मक काम वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. महापालिकेचे उत्पन्न स्रोत ठप्प असतानाही सीएसआरच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांटसह ही रुग्णालये उभारण्यात आल्यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचू शकले. त्याच काळात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या विद्युत दाहिन्यांची संख्या वाढविण्याचाही निर्णय वेगाने राबविण्यात आला.

प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून बांधकाम परवानग्यांसह विविध विभागांची कामे ऑनलाइन केल्यामुळे महापालिकेच्या कारभारात गती आणि पारदर्शकता आली. ई-गव्हर्नन्सच्या क्षेत्रात पुणे महापालिकेला देशपातळीवर अग्रस्थानी नेण्यात त्यांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा राहिला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें