घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*खडकवासला धरणतीरावर दहा हजार वृक्षांचा हरित पार्क

खडकवासला धरणतीरावरील खानापूरमध्ये धरणातून काढलेला गाळ पडीक जमिनीवर टाकून तेथे ग््राीन थंब संस्थेच्या पुढाकाराने व फिनोलॅक्स पाईप कंपनी व मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने दहा हजार वृक्षांचा हरित पार्क उभारला आहे.

तसेच, दोन किलोमीटर अंतराचा शेत रस्ताही तयार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती मालासह दूधवाहतुकीची सोय झाली आहे.

ग््राीन थंब संस्थेच्या पुढाकाराने लोकसहभागातून गेल्या पंधरा वर्षांपासून खडकवासलातील गाळ काढण्यात येत आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढली आहे. शेतकऱ्यांना मोफत गाळ व फळझाडे देण्यात येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीत भर पडत आहे. फिनोलॅक्स पाईप कंपनी व मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने खानापूरमधील धरणतीरावर दोन किलोमीटर अंतराचा रस्ता तयार करून दोन्ही बाजूंना सुपारी, नारळ आदी वृक्षांची लागवड केली आहे.

तसेच, हरित पार्कमध्ये दहा हजार आंबा, काजू, फणस, सिल्व्हर ओक, सुरू आदी वृक्षांची लागवड केली आहे. तसेच लोकसहभागातून धरणतीरावर मत्स्य उत्पादन तळी, पक्षी आयलंड तयार केली आहेत. फिनोलॅक्स कंपनीचे अधिकारी जितेंद्र जाधव व सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते सोमवारी (दि.2) हरित पार्कमध्ये वृक्षलागवड करण्यात आली.

यावेळी ग््राीन थंब संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्पाची माहिती दिली. कर्नल पाटील म्हणाले, धरणातील काढलेला गाळ तीरावर पडीक, दलदलीच्या ठिकाणी टाकून पाचशेहून अधिक एकर जमीन तयार केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें