घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भारत-बांगलादेश तणावात पुण्यात वेगळाच खेळ; बुधवार पेठेत बांगलादेशी अड्डा

पुणे | प्रतिनिधीभारत आणि बांगलादेशमधील तणावपूर्ण राजनैतिक पार्श्वभूमी असताना पुणे शहरात मात्र बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्याच्या मध्यवर्ती बुधवार पेठ परिसरातील ‘डिस्को’ नावाची इमारत ही थेट बांगलादेशी नागरिकांच्या अवैध वेश्याव्यवसायाचा अड्डा बनल्याचे पुणे पोलिसांच्या कारवाईत उघड झाले आहे.पुणे पोलिसांना बुधवार पेठ परिसरात काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर 27 जानेवारी रोजी ही मोठी धाड घालण्यात आली. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी तातडीने स्वतंत्र पथक तयार करत संबंधित इमारतीला चारही बाजूंनी घेराव घातला. त्यानंतर करण्यात आलेल्या कसून तपासात तब्बल 9 बांगलादेशी महिला आणि 1 बांगलादेशी पुरुष पोलिसांच्या ताब्यात सापडले.पोलिस तपासात हे सर्वजण बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्याकडे आढळलेली आधार कार्डे व इतर ओळखपत्रे बनावट असल्याचेही निष्पन्न झाले आहे. हे सर्व नागरिक बेकायदेशीर मार्गाने भारतात दाखल झाले असल्याची गंभीर बाब तपासात पुढे आली आहे.सध्या या सर्व आरोपींना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे नेमकी कोणी तयार करून दिली, यामागे कोणते दलाल किंवा टोळ्या सक्रिय आहेत, याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत. तसेच संबंधित आरोपींना पुन्हा बांगलादेशात पाठवण्याची (डिपोर्टेशन) प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.या कारवाईबाबत माहिती देताना उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी सांगितले की,“आम्हाला गुप्त माहिती मिळाल्यानुसार बुधवार पेठेतील डिस्को इमारतीत काही संशयित बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या आधारे छापा टाकला असता दहा बांगलादेशी नागरिक आढळून आले. हे सर्वजण वेश्याव्यवसायात सक्रिय असून त्यांच्याकडे बनावट कागदपत्रे सापडली आहेत. त्यांना ती कागदपत्रे कोणी दिली याचा तपास सुरू असून, सर्वांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.”या घटनेमुळे पुणे शहरातील अंतर्गत भागांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर घुसखोरी, मानवी तस्करी आणि अवैध व्यवसायांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुणे पोलिसांची ही कारवाई शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें