घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे बार निवडणूक : साडेसात हजार वकिलांचा मतदानात सहभाग; व्यवस्थापनाच्या नियोजनावर नाराजीचा सूर

पुणे :वकिलांची शिखर संघटना म्हणून ओळख असलेल्या पुणे बार असोसिएशन (PBA) च्या वार्षिक निवडणुकीत यंदा सुमारे साडेसात हजार वकिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे, मतदार यादीत तब्बल १४ हजार ५०० वकिलांची नावे नोंदवण्यात आली होती, मात्र त्यापैकी निम्म्याहून थोडेच अधिक वकिल मतदानासाठी उपस्थित राहिल्याचे चित्र दिसून आले.न्यायालयीन कामकाजात काटेकोरपणा, शिस्त आणि नियोजनाची अपेक्षा असताना, निवडणूक प्रक्रियेतील व्यवस्थापनातील त्रुटींमुळे अनेक वकिलांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसला. मतदान केंद्रांवरील व्यवस्था, वेळेचे नियोजन तसेच माहितीच्या अभावामुळे अनेक मतदार वकिलांनी असंतोष व्यक्त केला.“इतक्या मोठ्या संघटनेच्या निवडणुकीसाठी अजून अधिक सुयोग्य नियोजन अपेक्षित होते,” अशी प्रतिक्रिया काही ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केली.तर काही तरुण वकिलांनी, “मतदानाचा हक्क बजावण्याची इच्छा असूनही गैरसोयींमुळे परतावे लागले,” अशी खंत बोलून दाखवली.एकीकडे लोकशाही प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभाग ही सकारात्मक बाब असली, तरी दुसरीकडे एकूण मतदारांच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी राहिली, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.पुणे बार असोसिएशनसारख्या प्रतिष्ठित संस्थेने पुढील निवडणुकांसाठी अधिक पारदर्शक, सुटसुटीत आणि वकिलाभिमुख व्यवस्थापन करावे, अशी अपेक्षा यावेळी वकिलवर्गाकडून व्यक्त होत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें