घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*गंजपेठेत विवाहितेचा पतीकडून खून

गंजपेठ परिसरात एका २३ वर्षीय विवाहितेचा तिच्याच पतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर घरात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची खोटी माहिती देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती; मात्र पोलिसांच्या सखोल तपासात हा प्रकार खुनाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.वैष्णवी ऊर्फ वर्षा तुषार तुपसौदर्य (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता लतोंडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी कोण?

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :तुषार ऊर्फ गणेश विलास तुपसौदर्य (वय २८, रा. भवानी पेठ, हरकानगर) – पतीमनोज रोहिदास कांबळे (वय ३९, रा. भवानी पेठ, कासेवाडी)वनिता मनोज कांबळे (वय ३२, रा. गंजपेठ)

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास तुषार तुपसौदर्य याने काही कारणावरून पत्नी वैष्णवीच्या डोक्यात जबर मारहाण केली. या मारहाणीत वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर आरोपी तुषार याने मनोज कांबळे आणि वनिता कांबळे यांच्या मदतीने खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. घरातील रक्त पुसून टाकण्यात आले तसेच वैष्णवीचा मृत्यू अपघाती असल्याचा बनाव करण्यात आला.

डॉक्टरांनाही खोटी माहिती

तपासात असेही उघड झाले आहे की, वैष्णवीला मारहाण झाली असतानाही डॉक्टरांना घरात पाय घसरून पडल्याने ती जखमी झाली अशी खोटी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सुरुवातीला या प्रकरणाची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती.

खून उघडकीस कसा आला?

पोलिसांनी संशयास्पद बाबींचा बारकाईने तपास केला असता, मृत्यूचे स्वरूप आणि जखमा यामध्ये विसंगती आढळून आली. त्यानंतर सखोल चौकशी करत तीन फेब्रुवारी रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास सुरूया प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार करीत आहेत.

आरोपींनी हा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे केला,

यामागे कौटुंबिक वाद होता की अन्य काही कारण, तसेच पुरावे नष्ट करण्यामागील संपूर्ण कटाचा तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे गंजपेठ परिसरात खळबळ उडाली असून, विवाहितेच्या मृत्यूला अपघाती स्वरूप देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावल्याने आरोपी अडचणीत आले आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें