घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*कोट्यवधींचे साहित्य गोदामात पडून, कारवाई शून्य

महापालिकेच्या भांडार विभागाकडून कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी करून ते वापरात न आणता अनेक वर्षे गोदामात टाकून दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला असून, आयुक्त नवल किशोर राम यांनी चौकशीचे आदेश देऊनही अद्याप कोणावरही ठोस कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ मनसेने आज महापालिकेत आंदोलन केले.हे आंदोलन मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

यावेळी केदार कोडोलीकर, महेश शिर्के, ऋषी सुतार, प्रशांत भोलागीर, प्रियांका पिसे यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नेमके आरोप काय?

मनसेने केलेल्या आरोपांनुसार,भांडार विभागाने २०१५ साली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ७५ लाख रुपयांचे गणवेशाचे कापड आणि ६९.७१ लाख रुपयांच्या साड्या खरेदी केल्या. या साहित्याचे पूर्ण पैसे ठेकेदाराला अदा करण्यात आले. मात्र, इतकी वर्षे उलटूनही हे कपडे संबंधित कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आलेले नाहीत आणि ते आजही गोदामात पडून आहेत.

तसेच, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मागणीनुसार भांडार विभागाने ऑगस्ट २०२३ मध्ये सुमारे ५० लाख रुपये खर्च करून२० हजार किलो सिटी वेस्ट ट्रीटमेंट पावडर४ हजार लिटर लिक्विड बायोकॅटॅलिस्ट ‘इकोचीप’यांची खरेदी केली. मात्र हे साहित्यही अद्याप वापरात आणले गेले नसून गोदामातच धूळ खात पडून असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

निविदा केवळ बिले काढण्यासाठी?

मनसेचा आरोप आहे की, भांडार विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग तसेच लेखा व वित्त विभाग यांनी संगनमताने केवळ ठेकेदारांची बिले काढण्यासाठीच या निविदा प्रक्रिया राबवल्या. प्रत्यक्षात साहित्य वापरण्याचा कोणताही हेतू नसतानाही कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला, असा गंभीर आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला.या आरोपांची दखल घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त अरविंद माळी यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, चौकशी होऊनही अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने मनसेने अधिकाऱ्यांविरोधात थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

प्रशासनाची भूमिकाया संदर्भात अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले की,“या प्रकरणातील चौकशी पूर्ण झाली असून आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे.”

मनसेचा इशारा

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर या प्रकरणात लवकरात लवकर दोषींवर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. नागरिकांच्या कररुपी पैशांचा असा गैरवापर सहन केला जाणार नाही, असा ठाम पवित्रा मनसेने घेतला आहे.या प्रकरणामुळे महापालिकेतील कारभार, निविदा प्रक्रिया आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें