घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विषाणूंवर आधारित माहितीपूर्ण प्रदर्शन

राष्ट्र्रीय विषाणूविज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी – एनआयव्ही) यांच्याकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विषाणू, त्यांचे प्रकार आणि त्यापासून पसरणारे आजार याबाबत जनजागृती करण्यासाठी लष्कर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील प्रयोगशाळेच्या आवारात छोटेखानी पण अत्यंत माहितीपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

एनआयव्हीच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी थेट संस्थेतील शास्त्रज्ञ व संशोधकांशी संवाद साधत विषाणूंविषयी सखोल माहिती घेतली.

एनआयव्हीचे कार्य आणि संशोधनयाबाबत अधिक माहिती देताना प्रयोगशाळेचे संचालक डॉ. नवीन कुमार यांनी सांगितले की, एनआयव्ही ही संस्था भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) अंतर्गत कार्यरत आहे. संस्थेच्या स्थापनेला ७३ वर्षे पूर्ण झाली असून, येथे देश-विदेशातील विविध प्रकारच्या विषाणूंवर संशोधन केले जाते.

समाजामध्ये कोणते विषाणू सक्रिय आहेत, कोणत्या भागात विशिष्ट आजारांचे रुग्ण वाढत आहेत का, तसेच विषाणूंमध्ये जनुकीय बदल होत आहेत का, याबाबत सर्वेक्षण आणि संशोधन प्रक्रियेच्या माध्यमातून सातत्याने अभ्यास केला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि जनजागृतीएनआयव्हीच्या शास्त्रज्ञांकडून केवळ प्रयोगशाळेतील संशोधनच नव्हे, तर शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची माहिती दिली जाते. भविष्यात शास्त्रज्ञ किंवा संशोधक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले जाते, असे डॉ. कुमार यांनी सांगितले.

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना —पक्षी आणि प्राण्यांमधून विषाणू मानवात कसे पसरतातडासांमुळे होणारे आजार (डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आदी)विषाणूजन्य आजारांचा प्रतिबंध कसा करता येतोयाबाबत सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती देण्यात आली.

विषाणूंची संख्या झपाट्याने वाढतेय

डॉ. नवीन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषाणूंविषयी संशोधन वाढल्यामुळे त्यांची ओळख पटण्याचे प्रमाणही वाढले आहे.१९७१ साली जगात ज्ञात असलेल्या विषाणूंची संख्या केवळ २०० च्या आसपास होती.मात्र, सातत्याने होत असलेले संशोधन, नव्याने आढळणारे विषाणू आणि त्यांच्यात होत असलेले बदल यामुळे आज ही संख्या तब्बल १६ हजारांपर्यंत पोहोचली आहे.

ठळक मुद्दे :

✔ एनआयव्हीच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन

✔ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

✔ विषाणू, त्यांचा प्रसार आणि प्रतिबंध याबाबत सविस्तर माहिती

✔ पक्षी, प्राणी व डासांमधून पसरणाऱ्या आजारांवर भर

✔ शास्त्रज्ञ बनण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

✔ १९७१ मधील २०० विषाणूंपासून आज १६ हजारांपर्यंत वाढया प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यास मदत झाली असून, विषाणूजन्य आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एनआयव्हीचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें